आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जगातील सर्वात मोठ्या संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचे लोकार्पण उत्साहात

Spread the love

देहू : संत तुकाराम महाराज बीजच्या निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट – श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया आणि जिनिअस फाऊंडेशनचे CEO पवनकुमार सोलंकी, संकल्पना व आयोजन दिलीप सोनिगरा ज्वेलर्स, तसेच आध्यात्मिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी दिलीप सोनिगरा म्हणाले, “जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन नगरीत आम्ही वास्तव्य करतो आणि याच परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायात स्थिर आहोत. तुकाराम महाराजांवर आमची नितांत श्रद्धा, प्रेम आणि स्नेह आहे.

याच सद्भावनेतून आम्ही जगातील सर्वात मोठी पगडी तयार केली असून, तिची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया आणि जिनिअस बुकमध्ये झाली आहे.” सदर पगडीचा घेर २२ फूट, उंची ४ फूट, तर ५०० मीटर लांबीचा कपडा वापरून ती तयार करण्यात आली आहे.

पुढे ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे म्हणाले, “जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना दिलीप सोनिगरा यांनी दिलेली पगडी रूपी भेट अनमोल आहे. तुकाराम महाराज यांचे कार्य संपूर्ण जगभर पसरले आहे आणि आता त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठी पगडी मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू येथे विराजमान झाली आहे.”

ही भव्य पगडी प्रसिद्ध कारागीर शैलेश यादव यांनी तयार केली असून, तिच्या निर्मितीसाठी आणि पूर्वतयारीसाठी तब्बल दोन महिने लागले. ही पगडी सर्व भक्तांसाठी दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे.