आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आईच्या स्मरणार्थ आठवडी बाजारात पाणपोईचा उपक्रम

Spread the love

भूम : आठवडी बाजारात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे पत्रकार चंद्रमणी भाऊ गायकवाड यांनी आईच्या स्मरणार्थ पाणपोई सुरू केली आहे. त्यांच्या आई स्व. विमल गोरख गायकवाड यांच्या आदर्शांप्रती श्रद्धांजली म्हणून या उपक्रमाची सुरुवात झाली.

गेल्या तीन वर्षांपासून ही पाणपोई नियमित सुरू असून आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना थंड पाणी पुरवण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे. बाजारात येणाऱ्या लोकांना पाण्यासाठी मोठी गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन गायकवाड यांनी स्वखर्चातून थंड जारमधून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

थंड पाणी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या समाजोपयोगी उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केले.

या वेळी चंद्रमणी गायकवाड, माजी नगरसेवक रुपेश शेंडगे, युवा नेते आबासाहेब मस्कर, उद्योजक बच्चन गायकवाड, माजी नगरसेवक संतोष सुपेकर, संभाजी गरड, महेंद्र गायकवाड, पत्रकार तानाजी सुपेकर, 123 धाराशिव संपादक अजित बागडे, आनंद शिंदे, कदू जानराव, सुमित बाराते आणि अनेक नागरिक उपस्थित होते.