महापालिकेच्या या उपक्रमाने नागरिक संतुष्ट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा बुद्रुक, शांतिनगर, पार्श्व नगर, गगन उन्नती आणि चोरडिया कॉर्नर या भागातील अनधिकृत फलकांवर कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत परिसरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स व पोस्टर काढून टाकण्यात आले, ज्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण रोखले गेले आणि वाहनचालकांना होणारा त्रासही दूर झाला.
ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी राजेश कडबाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश चिन्ह विभागाने केली. अनधिकृत जाहिरातींमुळे रस्त्यांच्या दृश्यतेवर परिणाम होत होता आणि वाहतुकीला अडथळा येत होता. या कारवाईमुळे परिसर अधिक स्वच्छ आणि सुशोभित झाला असून, नागरिकांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात कठोर भूमिका घेतली असून, भविष्यात असे फलक लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
