आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फुलांच्या रंगपंचमीने वृद्धाश्रमात आनंदोत्सव

Spread the love

पुणे : रंगपंचमीच्या निमित्ताने मातृ-पितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात फुलांची रंगपंचमी साजरी करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आजी-आजोबांनी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत एकमेकांच्या अंगावर फुलांची उधळण करण्यात आली. प्रवीण चोरबेले गेली २० वर्षे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत हा सण आनंदात साजरा करतात.

आजी-आजोबा वयाचा विसर पाडून लहान मुलांसारखे मनसोक्त नाचत होते. चोरबेले यांच्या सततच्या सहवासामुळेच आम्हाला हा आनंद अनुभवायला मिळतो. “प्रवीण हे आम्हाला मुलासारखे वाटतात,” अशी भावना वृद्धाश्रमातील अनेक आजी-आजोबांनी व्यक्त केली.

रंगपंचमी साजरी करताना काही वृद्धांनी आपल्या आठवणी सांगितल्या. “लहानपणी अशी धमाल केली होती, तीच मजा आम्ही आता प्रवीण बाळामुळे घेतो,” असे त्यांनी सांगितले. सोबतच, चोरबेले दरवर्षी आजी-आजोबांना अल्पोपाहार देतात, तसेच वर्षभरात लागणाऱ्या उपयुक्त वस्तूंचीही सोय करतात. एवढेच नव्हे, तर त्यांना बाहेर फिरायलाही नेतात.

कोणत्याही अडीअडचणीच्या काळात ते आमच्या मदतीला धावून येतात, असेही वृद्धांनी सांगितले. या प्रसंगी प्रवीण चोरबेले यांच्यासमवेत संजय चोरडिया, अनिल भन्साळी, राजेंद्र सरदेशपांडे, रमेश देवकुळे, शैलाताई शेवाळे, कैलास परदेशी, अशोक वस्ते, पांडुरंग जगताप, हनुमंत मोरे, मनीषा खैरे, छाया चांदन, शिवा केंगारे, मयूर कोठारी, हेमंत जगताप, संजय माने, राहुल साळुंखे, सौरभ भडकुंबे, वेंकटेश भंडारी, इर्शाद अली, अमित माशाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.