• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 25, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या युवकाला अटक

February 25, 2026
0
25 2 26 3
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

बाणेर पोलिसांची कामगिरी : वडील व भावाकडून पैसे उकळण्यासाठी युवकाचे कृत्य

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या युवकाचे अपहरण करून २ लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यापैकी १० हजार रुपयेही घेतले गेले. मात्र हे अपहरण नसून संबंधित युवकाने वडील व भावाकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचे बाणेर पोलिसांनी उघडकीस आणून त्याला अटक केली आहे.

मनिषकुमार जमनाप्रसाद द्विवेदी (वय २१, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे या युवकाचे नाव आहे. मनिषकुमार हा बारावीत नापास झाल्यानंतर पुण्यात येऊन बाणेर येथे सुरक्षा रक्षकाचे काम करत आहे.

मनिषकुमार हा ९ फेब्रुवारी रोजी गावी जाणार होता. त्याने त्याच दिवशी गावी येत असल्याचे फोन करून सांगितले होते. मात्र रात्री त्याचा फोन बंद लागत होता. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मनिषकुमारच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना व फिर्यादी भावाला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज मिळाला.

त्यामध्ये, “यदि आप अपने बेटे को जिंदा देखना चाहते हो तो तुम्हारे पास छह घंटे हैं, दो लाख रुपये का इंतजाम कर लो। पुलिस को बताने की कोशिश भी की तो वह मारा जाएगा। क्यों रे तुम्हें वह नहीं चाहिए? अगर छह घंटे में पैसे नहीं मिले तो हम भाई को मार देंगे,” असा धमकीचा मेसेज पाठविण्यात आला होता.

भावाच्या जीवाला धोका असल्याचे वाटल्याने त्याच्या भावाने पुण्यात येऊन बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत व पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष पथक गठित केले. आरोपी व अपहृत व्यक्तीची सतत तांत्रिक माहिती काढण्यास पथकातील अधिकारी व अंमलदारांना सूचना देण्यात आल्या.

मनिषकुमार द्विवेदी हा घटनास्थळावरून कधी व कुठे गेला, कोणत्या वाहनाने गेला याबाबतची माहिती गोळा करण्यात आली. त्यामध्ये तो एकटाच रिक्षाने शहरात फिरत असल्याचे आढळून आले. तसेच म्हाळुंगे येथील एका सोसायटीमध्ये तो ९, १० व १२ फेब्रुवारी रोजी त्याच्या मित्राकडे एकटाच अनेकदा ये-जा करत असल्याचेही आढळले. दरम्यान, त्याच्या भावाने मनिषकुमारच्या खात्यावर १० हजार रुपये पाठविले होते.

मनिषकुमार २३ फेब्रुवारी रोजी पुण्यात आल्यावर त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने वडील व भावाकडून पैसे मिळावेत या उद्देशाने हे कृत्य केल्याचे कबूल केले. युवकाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव करून त्याचे खंडणीसाठी अपहरण झाले असल्याची खोटी माहिती नातेवाईकांना दिली होती आणि त्यांच्याकडून खंडणीची अग्रीम रक्कम म्हणून १० हजार रुपये ऑनलाइन घेतले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चुलूमुला, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग, सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदीप खरात, शरद राऊत, गजानन अवतिरक व स्वप्नील मराठे यांनी केली.

दारूच्या नशेत अपहरणाचा रचला बनाव
पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार त्याचे अपहरण खंडणीसाठी झाले नसावे, असे त्याच्या वर्तनावरून व हावभावावरून दिसून येत होते. मनिषकुमार नंतर अहमदाबाद येथे गेला होता तसेच तेथून तो प्रयागराज येथे गेल्याचे तपास पथकाला आढळून आले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव व पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, किसन शिंगे हे प्रयागराज येथे गेले. तेथे माहिती घेतली असता मनिषकुमार हा बारावीचे राहिलेले पेपर देण्यासाठी दुसऱ्या गावात गेल्याचे समजले. दरम्यान, त्याने दारूच्या नशेत पैसे मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याचे गावी गेल्यावर नातेवाईकांना सांगितले होते. त्याच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्याला पुण्यात आणण्यास सांगण्यात आले. तो पुण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Feb 20263 2

Latest Articles

येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले

येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले

February 25, 2026
प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा

प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा

February 25, 2026
बारावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

बारावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

February 25, 2026
नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शोध पत्रकारिता अखंड सुरू ठेवा : हेमंत देसाई

नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शोध पत्रकारिता अखंड सुरू ठेवा : हेमंत देसाई

February 25, 2026
पोलीस असल्याची बतावणी करून ३१ लाखांची फसवणूक

पोलीस असल्याची बतावणी करून ३१ लाखांची फसवणूक

February 25, 2026
Load More
Previous Post

बारावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

Next Post

प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले

येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले

February 25, 2026
प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा

प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा

February 25, 2026
स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या युवकाला अटक

स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या युवकाला अटक

February 25, 2026
बारावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

बारावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

February 25, 2026
नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शोध पत्रकारिता अखंड सुरू ठेवा : हेमंत देसाई

नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शोध पत्रकारिता अखंड सुरू ठेवा : हेमंत देसाई

February 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले

येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले

February 25, 2026
प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा

प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा

February 25, 2026
स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या युवकाला अटक

स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या युवकाला अटक

February 25, 2026
बारावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

बारावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

February 25, 2026
नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शोध पत्रकारिता अखंड सुरू ठेवा : हेमंत देसाई

नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करत शोध पत्रकारिता अखंड सुरू ठेवा : हेमंत देसाई

February 25, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले

येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले

February 25, 2026
प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा

प्रकाशशेठ धारीवाल यांच्या पुढाकाराने ३० एकरांवर श्री शिव महापुराण सोहळा

February 25, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta