पंढरपूरला पळून जात असताना केले जेरबंद : बिबवेवाडी पोलीस ठाण्याची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महिलेला ब्लॅकमेल करुन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. किरण औदुंबर ढाळे असे या नराधमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीला किरण ढाळे याने ब्लॅकमेल करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तिला शॉर्ट कपडे घालण्यास प्रवृत्त करुन व्हिडिओ कॉल करुन केला़ त्यावर फिर्यादी हिचा स्क्रीन शॉट काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
फिर्यादी हिचे पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेला होता. हा प्रकार जवळपास ८ महिने सुरु होता. त्याच्या अत्याचाराला कंटाळून शेवटी या महिलेने बिबवेवाडी पोलिसांकडे धाव घेतली.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी घटनास्थळाला भेट दिली. किरण ढाळे याचा शोध सुरु केला.
तो पंढरपूरला पळून जाण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी स्वारगेट परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. किरण ढाळे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, रक्षित काळे यांनी केली आहे.

















