भारत सरकारकडून पेटंट मिळाल्याबद्दल सत्कार : सुनील डुंगरवाल व ज्योती डुंगरवाल यांचाही सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : ज्येष्ठ पत्रकार सुनील डुंगरवाल यांचे चिरंजीव श्रेयस सुनीलकुमार डुंगरवाल यांना त्यांच्या संशोधनासाठी भारत सरकारकडून पेटंटची मान्यता मिळाल्याबद्दल भुम येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
हा सत्कार माजी नगराध्यक्ष विकासरत्न संजय नाना गाढवे व माजी नगराध्यक्षा सौ. संयोगिता गाढवे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी श्रेयस यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुनील डुंगरवाल आणि ज्योती डुंगरवाल यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास युवा उद्योजक बालाजी माळी, महादेव मनगीरे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
