भगवान महावीर जन्म कल्याणक व अहिंसा सप्ताहानिमित्त शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
चिंचवड : भगवान महावीर जन्म कल्याणक व अहिंसा सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड जैन महासंघ, क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड व वर्धमान जैन श्रावक संघ, चिंचवड स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे उद्घाटन आज क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेडचे चेअरमन राजेंद्र मुथा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे पदाधिकारी, विविध जैन श्रावक संघांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रा. अशोक पगारिया, सुभाष ललवाणी, नितीन बेदमुथा, सुभाष सुराणा, श्रेयांस पगारिया, विलास पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, अशोक लुंकड, सतीश मेहेर, आनंद मुथा, डॉ. अशोक बोरा, उमेश पाटील, विरेश छाजेड, संदीप फुलफगर, राजेंद्र बोरा, किरण रांका, नेमसुख मांडोत, श्रेणिक मंडलेचा, राहुल लुंकड, हर्षद लुंकड, शीतल खिंवसरा आणि क्रस्ना डायग्नोस्टिकचे डॉक्टर्स यांचा समावेश होता.
या उपक्रमामुळे नागरिकांना वेळेवर निदान व उपचारांची सुविधा मोफत मिळणार असून, जैन समाजाच्या सेवाभावी कार्याची प्रचिती पुनः एकदा अधोरेखित झाली आहे.
