महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भुम शहरातील युवानेते आबासाहेब मस्कर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, ज्येष्ठ नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. मिलिंद पाटील, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, जिल्हा सरचिटणीस मा. विकास कुलकर्णी, परांडा विधानसभा प्रमुख मा. बाळासाहेब क्षीरसागर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
