वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई : २.७० लाखांचा ऐवज जप्त, तीन गुन्हे उघड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुंबई-बंगलोर महामार्गावरील सर्व्हिस रोडवर महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या दोघा चोरट्यांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कडून २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत, तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आकाश आंबादास आंधळे (वय २४, रा. दांगट पाटीलनगर, शिवणे) आणि सुजल नरेश वाल्मिकी (वय २०, रा. दांगट पाटील इस्टेट, शिवणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
गेल्या साडेतीन महिन्यांत वारजे माळवाडी परिसरातील महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर एकट्या आणि विशेषतः ज्येष्ठ महिलांना लक्ष करून, चोरटे मोटारसायकलवरून येत त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावत होते.
या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले. या पथकाने दोन आठवडे सातत्याने सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण केले, बातमीदारांमार्फत माहिती मिळवल, कि निखील तांगडे आणि अमित शेलार यांना चोरटे एनडीए ग्राउंड, वारजे येथे असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून पोलिस अंमलदार व पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण तीन गुन्ह्यांचा तपशील समोर आली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत कोईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांच्या पथकातील पोलिस अंमलदार संजीव कळंबे, शरद वाकसे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, गोविंद कपाटे, अमित जाधव, गणेश शिंदे यांनी पार पाडली.
