आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भुम येथील राममंदिरात परशुराम जयंती सोहळा उत्साहात पार पडला

Spread the love

भूम : कसबा येथील श्रीराम मंदिरात श्री भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध धार्मिक क्रियाकलाप राबवले गेले. सायंकाळी श्रीराम मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला, नंतर ब्रम्हवंद यांच्या उपस्थितीत मत्रोउच्चाराने श्री भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पवृष्टीनंतर महाआरती केली गेली आणि प्रसाद वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या वेळी ब्राह्मण समाजातील पंधरा महिला आणि नागरिकांचा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये धार्मिक क्षेत्रातील ह. भ. प. अरुण शाळु महाराज, शेती क्षेत्रातील सुधिर देशमुख, सामाजिक कार्यात प्रभाकरराव रावगावकर, चंद्रशेखर देशमुख, मनोज क्षिरसागर, गणेश कुलकर्णी, वाणिज्य क्षेत्रातील श्रीराम मुळे, संगीत क्षेत्रातील ए. पी. देशपांडे, मकरंद बेलसरे, सौनिक क्षेत्रातील हेमंत देशमुख, पत्रकारीताच्या क्षेत्रातील गोपाळ व्यवहारे आणि अरुण देशमुख, तसेच गृहिणी म्हणून सौ. मंजिरी देवडीकर यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या वेळी पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, ह. भ. प. अरुण शाळु महाराज, मुकुंद बेलसरे, ब्राह्मण महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विलास शाळु, तालुका अध्यक्ष सुधिर देशमुख, शहर अध्यक्ष संजय शाळु, जिल्हा समन्वयक ए. पी. देशपांडे, जनसेना नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीराम मुळे, वेदशास्त्री राजाभाऊ धर्माधिकारी, आनंद बेलसरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. पी. देशपांडे यांनी केले. यासाठी सचिन बारगजे, जनसेवा बँकेचे व्यवस्थापक महेश तांबोळकर, रत्नाकर आरगडे, प्रशांत बुरटे, मनीष राजोपाध्ये, दत्तन देशमुख, आनंद बेलसरे आणि अरुण देशमुख यांच्यासह सर्व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.