महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुणे शहरातील गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिराचा ध्वजारोहण सोहळा आज अत्यंत भक्तिभावात व उत्साहात पार पडला. आठ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या भव्य मंदिरात आशापुरा माता, महालक्ष्मी माता, अंबा माता, सच्चाई माता, पद्ममावती माता, श्री गणेश आणि श्री सोनाना खेतलाजी यांच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत.
मंदिराच्या स्थापना दिवसानिमित्त मंदिरात पूजा, अभिषेक, मंत्रजाप व आरती यांचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात व शेकडो भक्तांच्या उपस्थितीत मंदिराच्या मुख्य ध्वजाचे विधीवत ध्वजारोहण करण्यात आले. यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय आणि मंगलमय झाला होता.
याप्रसंगी माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी, गौरव बाफना, दिलीप मुनोत, प्रदीप चोपडा, रवींद्र सांकला, इंदर जैन, इंद्रकुमार छाजेड, श्याम खंडेलवाल, मंगेश कटारिया, आदी मान्यवर व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 वर निवड झालेले एमजेएफ लायन राजेंद्र गोयल (Second VDG Elect) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याबरोबरच इंग्लंड मध्ये झालेल्या स्वीमिथॉन मध्ये यशस्वी सहभाग नोंदवणाऱ्या साक्षी मनोज छाजेड हिचाही गौरव करण्यात आला.
मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव, दिवाळी पहाट व विविध धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असून, हे मंदिर श्रद्धा, संस्कृती आणि सेवा यांचे प्रतीक बनले आहे.
ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने झालेला कार्यक्रमात हा भक्ती, सामाजिक सन्मान आणि उत्साह यांचा संगम ठरला.
