शंकरराव पाटील महाविद्यालय : पाथरूडच्या NSS विभागातर्फे भूम येथे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, पाथरूड येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने भूम येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्या विकास मंडळ, पाथरूडचे सहसचिव प्रा. संतोष शिंदे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर इतिहास विषयाचे प्रा. नंदकुमार जगदाळे यांनी संभाजी महाराजांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करत त्यांच्या महान कार्यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.
प्रा. संतोष शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराज हे धैर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे अद्वितीय योद्धे होते. त्यांचे जीवन तरुणांना सदैव प्रेरणा देणारे आहे.”
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रा. गौतम तिजारे, प्रा. भोंग, कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री केशव बोराडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री महामुनी हारी, तसेच वरिष्ठ लिपिक कुंदन बोराडे यांच्यासह इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन NSS कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांनी अत्यंत उत्कृष्ट रीतीने पार पाडले. संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने व प्रेरणादायी विचारांनी भारलेले होते.
