आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रास्तभाव दुकानांतून तीन महिन्यांचे धान्य मिळणार जूनमध्येच

Spread the love

पुणे : आगामी पावसाळा तसेच संभाव्य पूरस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये अन्नधान्याच्या उचल व वितरणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

ही बाब लक्षात घेता, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (NSFA) अंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य मिळावे यासाठी ऑगस्ट २०२५ पर्यंतचे तीन महिन्यांचे धान्य जून महिन्यातच वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धान्याची उचल ३१ मेपर्यंत पूर्ण करणे आणि वाटप ३० जूनपर्यंत संपवणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

तालुकास्तरीय यंत्रणांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश
जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर, वेल्हा, पुरंदर व हवेली या तालुक्यांतील तहसीलदारांनी NSFA अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याच्या उचल व वितरणाची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.