छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.
या कार्यक्रमास माजी आमदार राहुल भैय्या मोटे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अॅड. संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील, अॅड. सुजित देवकते, भाऊसाहेब खरसडे, डॉ. रविंद्र जकताप,
पोलीस निरीक्षक ओंकार पारेकर, धनंजय हांडे, सुबोधसिंह ठाकूर, अॅड. औसरे, आप्पा मुसळे, जयदेव गोफणे, आप्पा तरटे, बापू ठोंबरे, सुभाष मारकड सर, बिठू मदने, गनीभाई हावरे, नागनाथ नरुटे, दयानंद बनसोडे, खय्यूम तुटके, शरद झोंबाडे सर, रमेश गरड, बाप्पा काळे, भरत ननवरे, अजिंक्य कोळगे, बदरूद्दीन बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाधान कोळेकर, विवेक पाटील, गणेश मदने, तुषार कोळेकर, सिद्धांत वाघमारे, आशिष बोराडे, ऋषिकेश बुरुंगे, रुपेश बनसोडे, अनिकेत मदने यांसह अनेकांनी राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन करून त्यांचे कार्य स्मरले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रमाता अहिल्यादेवींच्या जयघोषात करण्यात आली.
