३०० व्या जयंतीनिमित्त भाजपच्या भूम कार्यालयात अभिवादन सोहळा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय, आदर्श प्रशासक आणि समाजसुधारक होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भूम येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या अभिवादन कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी परांडा विधानसभा प्रमुख मा. बाळासाहेब क्षीरसागर, तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, युवा नेते आबासाहेब मस्कर, व्यापारी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गवळी, मुंकुद वाघमारे, सिद्धार्थ जाधव,
तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर, सुब्राव शिंदे, आकाश शेटे, अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष लताताई गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला तालुका अध्यक्ष स्वातीताई तनपूरे, उषा आसलकर, वर्षा वीर, शुभांगी देशमुख, विद्या खामकर, सविता जाधव, रोहिणी लोंखडे यांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
