स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. पवनकुमार वानखडे यांचे मोलाचे मार्गदर्शन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्यातील एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-सीईटी २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत महाविद्यालयाचा सन्मान वाढविला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्रेणिक डुंगरवाल (९२.२४ पर्सेंटाइल), सिमरन चौधरी, नितीन पाटील, मृणाल भंडारकर, विनीत धोत्रे, आदित्य डोंगरे, संजना देशमुख, मेघा टकरानी, विनोद ठाकरे, सरोज भोसले, शिवतेज घोरपडे यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. परीक्षेच्या तयारीदरम्यान स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. पवनकुमार वानखडे यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले, तसेच विविध तज्ञ मान्यवरांचे लेक्चर्स आयोजित करून परीक्षेपूर्व तयारीसाठी विशेष प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संकुल संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
