महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : Greenlam Industries च्या अधिकृत MFC Prelam वितरक ADVY Plylam Pvt. Ltd. आणि Sha Ramanlal & Sons यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी 12 जून 2025, गुरुवारी Handewadi Trade Market येथील त्यांच्या वेअरहाऊसमध्ये विशेष Meet & Greet कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 3:30 वाजता होणार असून, Greenlam MFC Prelam च्या अद्ययावत स्टॉकची माहिती व त्यांच्या नवीन वेअरहाऊस सेटअपचे सादरीकरण OEM पार्टनर्स, उत्पादक आणि डीलर्स समोर करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे उत्पादने, साठा व्यवस्थापन आणि आधुनिक सुविधांबाबत माहिती देणे, तसेच भविष्यातील व्यावसायिक संबंध अधिक दृढ करणे हा आहे. नवीन वेअरहाऊसमध्ये करण्यात आलेले सुधारित बदल, उच्च तंत्रज्ञान आणि सुविधा विस्तार याचे सविस्तर प्रेझेंटेशन या वेळी करण्यात येईल.
पुणे आणि परिसरातील सर्व प्रमुख OEM पार्टनर्स, डीलर्स आणि इंडस्ट्रीतील महत्त्वाच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
“Handewadi Trade Market ही उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी असलेली, दोन मुख्य रस्त्यांशी जोडलेली आणि सर्व आधुनिक सुविधा असलेली जागा आहे – जसे की लाईट, पाणी, रस्ते आणि लोडिंगसाठी योग्य जागा. येथे अनेक मोठे लाकूड व्यापारी देखील दाखल झाले आहेत, ज्यामुळे येथील टिम्बर मार्केट वेगाने विकसित होत आहे. Greenlam MFC Prelam चा सशक्त सप्लाय बेस आणि आमचा प्रीमियम वेअरहाऊस सेटअप, आम्हाला पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात व्यवसाय विस्तार करण्यास सक्षम करतो.” – कल्पेश शाह, संचालक, ADVY Plylam Pvt. Ltd.
