शिष्यवृत्ती परीक्षेत बार्शीच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश : जिल्ह्यातून १० विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल, बार्शीचा विद्यार्थी सर्वेश धनाजी राऊत याने २८२ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक, तर जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला.
परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल, बार्शीचा विद्यार्थी सर्वेश धनाजी राऊत याने २८२ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक, तर जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला.
या परीक्षेत इयत्ता पाचवीचे तीन आणि आठवीचे सात, अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना सूर्यकांत चोरमले, शितल सातपुते, अनिता नागटिळक व स्मिता मुळे यांचे मार्गदर्शन लाभले, तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना देशपांडे, जयसिंग कदम व माया इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर, उपप्राचार्य रामकृष्ण इंगळे, पर्यवेक्षक प्रसन्न देशपांडे, पर्यवेक्षिका उर्मिला जावळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले.
पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
आयुष आनंद देशमुख – २३२ गुण
कुमारी अवंती अमोल आवारे – २२० गुण
रुद्र ज्ञानेश्वर मांजरे – २१८ गुण
पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले विद्यार्थी
सर्वेश धनाजी राऊत – २८२ गुण (राज्यात ७वा, जिल्ह्यात २रा)
कुमारी ज्ञानेश्वरी रामचंद्र बरचे – २७० गुण
दीपराज रतिकांत हमणे – २५४ गुण
यश अतुल शेटे – २५२ गुण
समर्थ संतोष देशमुख – २४२ गुण
प्रणव गणेश माळी – २३८ गुण
ऋषिकेश राजेंद्र मुळे – २२४ गुण
