सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून सुमारे १४,९३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपीकडून ०८ घरफोड्यांचे गुन्हे उघड करण्यात आले असून, त्याच्याकडून ९६ ग्रॅम सोने, ३५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ११ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानीय गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकास गुन्हे उघड करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार पोलीस उप-निरीक्षक सुरज निंबाळकर व त्यांचे पथक टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना, पोहेकॉ. विजयकुमार भरले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे (वय ४२, रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) टेंभुर्णीतील अकलुज चौकात आढळून आला आहे.
तातडीने पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपी मंगेश याच्या चौकशीत त्याने त्याचे साथीदार राम काळुराम भोसले आणि श्याम काळुराम भोसले (दोघे रा. पिटकेश्वर, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्यासमवेत खालील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली.
या आरोपीकडून तपासात सुमारे ₹ ४,०६,३००/- किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ₹ १,८३,०००/- किंमतीचे मोबाईल हँडसेट असा एकूण ₹ ५,८९,३००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर जप्त मुद्देमालाची बाजारमूल्य किंमत अंदाजे ₹ १४,९३,०००/- इतकी आहे.
आरोपी मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगोला, परंडा, बारामती, इंदापूर येथील पोलीस ठाण्यांत ७ घरफोडी व ३ मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पो.उ.नि. सुरज निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खालील पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता:
पोहेकॉ: सलीम बागवान, हरीदास पांढरे, विजयकुमार भरले, शशिकांत कोळेकर, मपोहेकॉ अश्विनी गोटे, पल्लवी इंगळे, दिपाली जाधव पोकों अन्वर आत्तार, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, मपोकों सुनंदा झळके, चापोकों दिलीप थोरात, सायबर पोलीस ठाणे व्यंकटेश मोरे. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढला असून गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

