माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भुम : भुम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रवीण देशमुख तर उपसभापतीपदी आप्पासाहेब हाके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. या निमित्ताने नगराध्यक्ष विकासरत्न संजय नाना गाढवे यांनी नूतन सभापती प्रवीण देशमुख व उपसभापती आप्पासाहेब हाके यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गौतम लटके, तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, युवा सेना पदाधिकारी निलेश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक, भाजप नेते रोहन जाधव, माजी सरपंच प्रशांत मुंडेकर, अतुल शेळके, संदीप खराडे, रामभाऊ बागडे, बाळासाहेब अंधारे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
