मा. आमदार राहुल मोटे यांच्या हाती पुन्हा घड्याळ : अजित पवारांनी केले स्वागत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भुम : धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला.त्यामुळे पुढील काळात परांडा मतदार संघाची राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित.
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राहुल, मी तुझ्या पाठीशी आहे. धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करा.” अजित पवार यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “राहुल मोटे यांनी यापूर्वीच पक्षात प्रवेश करायला हवा होता, पण तिकीट मिळेल किंवा नाही, यामुळे तो निर्णय थांबला होता. मात्र आता त्यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी राहील.”
माजी आमदार राहुल मोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “माझ्यावर पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल आणि पक्षवाढीसाठी निष्ठेने प्रयत्न करेन.” हा प्रवेश सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी, मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे पार पडला.
यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राहुल मोटे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या शांत, संयमी आणि कार्यकर्त्यांचा आदर करणाऱ्या स्वभावामुळे त्यांना राजकीय वर्तुळात विशेष ओळख मिळाली आहे.
पक्ष प्रवेशावेळी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर
आमदार अमोल मिटकरी, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, मधुकर मोटे, रणजित मोटे, महादेव खैरे, प्रताप देशमुख, तात्यासाहेब गोरे, सुभाष वेताळ, बाबुशेठ डुंगरवाल, प्रकाश मोटे, महादेव मोटे,सारंग मोटे, संपत काटवटे, मारुती पवार, प्रदीप डोके, नामदेव घाडगे, रामदास मोटे, रणजीत गायकवाड, प्रशांत कवडे, अभिजित जगताप, रमेश पाटील, रविकिरण मोराळे, मनीष भराटे, जयंत जोगदंड, आदिनाथ पालके, गणेश खवले, बाळासाहेब काटवटे, बलभीम भसाड, रमेश मस्कर, अण्णासाहेब भोगील, संजय पाटील, नवनाथ जगताप, विजय बोराडे, श्रीराम खंडागळे, सतीश सोन्ने, रामराजे साळुंके, हनुमंत पाटुळे, सूर्यकांत सांडसे, प्रवीण खटाळ, राहुल पाटील देवळालीकर, भगवान पाटील, भाऊसाहेब खरसडे, शहाजी दराडे, भाऊसाहेब चोरमले, राहुल बनसोडे, खय्यूम तुटके याशिवाय भूम, परंडा, वाशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, आजी-माजी जि.प. व पं.स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, सहकारी संस्था प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
