प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया : गुणवत्ता, निष्ठा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या विद्यार्थ्यांनी यंदाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंट मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. देश-विदेशातील पंचतारांकित व सप्ततारांकित हॉटेल्ससह अनेक प्रतिष्ठित आस्थापनांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. संस्थेसाठी ही कामगिरी अभिमानाची व कौतुकास्पद असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.
‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर न्यूझीलंड, मॉरिशस, पुणे, मुंबई, जयपूर आदी ठिकाणच्या नामांकित हॉटेल्समध्ये स्थान मिळवले. कुणाल अमर चौरे, हर्षल अशोक गायकवाड, अनुराग पार्की (कॉर्डिस हॉटेल्स-न्यूझीलंड), अमेय अनिल पापळ, अविष्कार संतोष वाबळे (सीपॉईंट बुटीक हॉटेल – मॉरिशस), ओंकार मिरगुंदे, साईराज बालवडकर, संदीप लोंढे, प्रतीक सोनवणे, संग्राम गंजे, प्रदीप लगड (द वेस्टिन -पुणे) आदींची निवड झाली आहे. तसेच निनाद फडके, अर्जुन नाम्बियार (द रिट्झ कार्लटन), अविष्कार वाबळे (ट्रायडेंट बीकेसी – मुंबई), पायल धनवे (जे. डब्ल्यू. मॅरियट – सहार), श्रद्धा चव्हाण (मेरिएट – जयपूर) यांनाही इंटर्नशिप मिळाली आहे.
याआधीही सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, अमेरिका, न्यूझीलंड यांसह अनेक देशांत ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. शांग्रीला हॉटेल (मॉरिशस), रिटलबर्ग हॉटेल (जर्मनी), हिल्टन (मलेशिया), इंडियन किचन स्पाईसेस लिमिटेड (चीन), द रिजंट (सिंगापूर), हॉलिडे इन (अमेरिका), रिनाइसन्स (फ्लोरिडा), सन सिटी (पटाया), मेरियट (सिंगापूर) यांसारख्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये माजी विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहेत. अनेकांनी स्वतःचा व्यवसायही यशस्वीपणे उभारला आहे.
जागतिक दर्जा टिकवण्यासाठी संस्थेने स्विस्सम रशिया, लिंकन विद्यापीठ (मलेशिया), लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपीटी), अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी आणि प्लेसमेंटमुळे महाराष्ट्र व पश्चिम विभागात कॉलेजला तिसरे स्थान मिळाले आहे.
२०२१ मध्ये ‘सूर्यदत्त महामिसळ’ उपक्रमातून सात तासांत ७ हजार किलो मिसळ तयार करून ३० हजार लोकांना वितरण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय चिक्की व शाबूची खिचडी बनवून वितरण, सलग २४ तास प्रबोधन, संशोधन आणि नवकल्पना अशा उपक्रमांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० टक्के इंटर्नशिप व प्लेसमेंटची परंपरा यंदाही अभिमानाने कायम ठेवत ‘सूर्यदत्त’ने गुणवत्ता, निष्ठा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा नवा आदर्श निर्माण केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न, ‘नॅक’ मान्यताप्राप्त आणि तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र मान्यताप्राप्त ‘एससीएचएमटीटी’ची स्थापना २००५ मध्ये झाली.
२१ वर्षांच्या प्रवासात संस्थेला आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येथे बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज अभ्यासक्रम चालवला जातो. प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, औद्योगिक कंपन्यांना भेटी, फूड फेस्टिवल, तज्ज्ञांचे चर्चासत्र यांसारखे उपक्रम राबवले जातात. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
५० पेक्षा अधिक देशांत विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केली आहे. फिटनेस, ब्युटी वेलनेस, जिम, एअरहोस्टेस यांसारखे अल्पकालीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मल्टीटास्किंगमध्ये पारंगत करतात.त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, उद्योगव्यवसायातील रुची आणि संयोजन कौशल्य वाढते. – सुषमा चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

