मुंबईसह कोकणात अतिवृष्टी : पुण्यात ६० मिमी पावसाची नोंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी नोंद झालेल्या ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासांत विक्रमी ५७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २५ जुलै २०२४ रोजी येथे ५५६ मिमी पाऊस पडला होता.
हवामान विभागानुसार, २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी मानले जाते. ताम्हिणीत तर त्याच्या तिपटीने पाऊस झाला आहे. चेरापुंजी हे देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जात असले तरी ताम्हिणी येथे त्याहून अधिक पाऊस होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी आकडेवारीनिशी स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी ताम्हिणी घाटात तब्बल ९६४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदाही पावसाळ्यातील दीड महिना बाकी असतानाच आतापर्यंत येथे ७४२८ मिमी पाऊस झाला आहे. राज्यातील घाटमाथ्यांवर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, पुणे शहरात ६० मिमी पाऊस पडला आहे. मुंबई, कोकणासह कोल्हापूर परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत.
गेल्या २४ तासांतील पावसाची नोंद (मिमीमध्ये)
ताम्हिणी – ५७५
भिरा – ५६८
लोणावळा (टाटा) – ४१८
लोणावळा (ऑफिस) – ३९०
माथेरान – ४३८
महाबळेश्वर – ३०१
शिरगाव – ४३०
शिरोटा – १८५
ठाकूरवाडी – १३६
वळवण – २७१
अंबोणे – ३३८
भिवपुरी – २२०
डोंगरवाडी – ३७३
कोयना (नवजा) – ३१६
कोयना (पोफळी) – २६६
खोपोली – ३०५
सांताक्रूझ – २०९
धारावी – १४२
वैतरणा – १७७
तानसा – १८४
तुलसी – २९६
विहार – २८७
भातसा – १६३
ठाणे – १९५
गिरीवन – १६८
शिवाजीनगर (पुणे) – ६०
डहाणू – १५१
