महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : भुम-परांडा येथील भाजप संपर्क कार्यालयात नुकतीच जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भूम-परांडा-वाशी विधानसभा प्रमुख तसेच वाशी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे, अल्पसंख्याक आघाडी भाजप सरचिटणीस आदम शेख व कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहन जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बापू बगाडे, वनवे ब्रह्मदेव उपासे, प्रमोद डोके, सचिन बारगजे, अमित पाटील, संदीप महानवर, बाबासाहेब गायकवाड, बाबासाहेब जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
