परवडणाऱ्या दरात मिळणार आरोग्यसेवा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : नाशिक शहरातील मुंबई नाका येथील सुवोजित डाटामॅटिक्स इमारतीत डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्स या अत्याधुनिक एकत्रित निदान केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार (IAS) यांच्या हस्ते संपन्न झाले.
या केंद्रात एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी (USG), एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब यांसारख्या अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुण्यातील वडगावशेरी येथील पहिल्या शाखेसह काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या डायग्नोपिनने अल्पावधीत महाराष्ट्रातील एक प्रमुख एकत्रित निदान सेवा प्रदाता म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
विशेष म्हणजे, या केंद्रातील सर्व सेवा परवडणाऱ्या व सवलतीच्या दरात रुग्णांना मिळणार आहेत. यामध्ये एमआरआय तपासणी दिवसाला फक्त 2500/- व रात्री 1900/-, सीटी स्कॅन केवळ 999/-, सोनोग्राफी 500/- पासून तर पॅथॉलॉजी तपासण्या बाजारभावापेक्षा 30 ते 50 टक्के कमी दरात उपलब्ध होणार आहेत.
याशिवाय उद्घाटनानिमित्त नाशिक शाखेत शुगर, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, युरिक ऍसिड व थायरॉईड (टीएसएच) या पैकी कोणतीही एक तपासणी फक्त 10/- मध्ये करून घेण्याची विशेष संधी रुग्णांना देण्यात आली असून ही ऑफर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू असेल.
“सर्वांसाठी परवडणारी व सहज उपलब्ध आरोग्यसेवा” हे डायग्नोपिनचे ध्येय असल्याचे सांगून या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे ओंकार पवार यांनी कौतुक केले. उद्घाटन सोहळ्यात डायग्नोपिनचे प्रवर्तक तसेच कोठारी कुटुंबातील तीन पिढ्या शांतिलाल, प्रफुल व मितेश कोठारी यांच्यासह सतीश बनवट, नरेंद्र छाजेड, अभिजीत छाजेड, राजू धरिवाल, डॉ. निलेश लोढा, डॉ. प्रशांत भदाने, महावीर ब्रम्हेचा, प्रेमचंद ताथेड, ताराचंद कुमठ आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
