महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : गेल्या आठ दशकांपासून घराघरांपर्यंत पोहोचलेल्या व घराचा अविभाज्य भाग बनलेल्या जयराज अँड कंपनीचे संस्थापक कै. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त मार्केट यार्ड परिसरातील हमाल कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या १८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी गुजराती बंधू समाजाचे कार्यकारी विश्वस्त नैनेश नंदू, जयराज ग्रुपचे राजेश शहा, दीपक बोरा, प्रवीण चोरबेले, आशिष दुगड, राजेंद्र बाठिया, रायकुमार नहार, रमेशभाई पटेल, दिलीप रुणवाल, हमाल पंचायत तर्फे दत्ताभाऊ डोंबाळे, संदीप मारणे, शिवाजी बाबर तसेच रिक्षा पंचायतचे नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जयराज अँड कंपनीतर्फे दरवर्षी शैक्षणिक व आरोग्य विषयक सामाजिक कामांचे नियोजन केले जाते. वैद्यकीय क्षेत्रात, मेहसाणा (गुजरात) येथे सुरू करण्यात आलेले ‘कांचन हिरा आयुर्वेदिक कॅन्सर रिसर्च सेंटर’ गेल्या सात वर्षांपासून दररोज जवळपास तीनशे रुग्णांना लाभ देत आहे.
तसेच, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या मदतीने गरजूंसाठी डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजित केल्या जातात. कै. हिराभाई शहा यांनी लावलेले सामाजिक कार्याचे रोपटे आज वटवृक्षात परिवर्तित झाले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक कुलकर्णी यांनी केले, तर आभारप्रदर्शन गणपती मंडळाचे अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी केले.
या विद्यार्थ्यांना दिली शिष्यवृत्ती –
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी : आदित्य गाडे, दर्शन कुंभार, ओम दळवी, भार्गव मारणे, सुरज रसाळ, यश गर्जे, तेजस्वी करपे, निकिता पवार, संस्कृती गोळे, सृष्टी कुडले, सिद्धेश राजिवडे, श्रद्धा खराडे, अंकिता पर्वते, सोहम जगताप.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थी : संस्कृती फुंदे, स्नेहा बिनवडे, रुचिता धायगुडे, समर्थ गर्जे.
