महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : आरसोली येथे मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांचा ग्रामस्थांच्या वतीने वाजतगाजत मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला.
माजी सरपंच प्रशांत काका मुंडेकर युवा मंच व सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावातील महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून मराठा बांधवांना शुभेच्छा दिल्या.
