महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला मोठे यश मिळाले. मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजाने शांततेत आंदोलन केले. समाजाच्या या एकजुटीसमोर महायुती सरकारला झुकावे लागले आणि शेवटी आरक्षण जाहीर करावे लागले.
या लढ्यामध्ये भूम तालुक्यातील अनेक सकल मराठा बांधवांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आझाद मैदानापर्यंत सक्रिय सहभाग नोंदविला. आंदोलनात सहभागी झाल्यामुळे काहींवर गुन्हे दाखल झाले तसेच न्यायालयीन लढ्यात विधिज्ञांनीही मोठी मदत केली. या सर्वांचा गौरव करण्यासाठी भूम येथील अविनाश नगर, पार्डी रोड येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विठ्ठल बाराते, ऍड. विलास पवार, पेंड रामराजे साळुंके, संतोष वरळे, संदीपान कोकाटे, प्रा. अरुण गाढवे, भागवत साळुंके, अनिल उंदरे, अशोक भोरे, बालाजी पाटील, वाळासाहेब मुळे, प्रशांत गायकवाड, हृतिक वीर, आनंद गाढवे, गणेश गाढवे, अर्जुन जाधव, भरत पाटील, सागर काळे, कानिफनाथ नलवडे, शिवाजी जरडकर, गणेश माळी, विनोद वरळे, सोमनाथ साबळे, रोहित नाईकवाडी, रामराजे मुंढेकर, मोहन शेंडगे, श्रीराम बोराडे, संदीप गाढवे, जयकुमार भोरे, अंगद भोसले, अण्णासाहेब कवाळे, दादासाहेब मुंडेकर, सागर वाघमारे, अमोल बोराडे, सचिन मस्कर, प्रतिकसिंह पाटील, गणेश नलवडे, मनोज नलवडे, प्रशांत गवळी, अक्षय शिंदे, रोहन गाडे, अवधूत गाढवे, नितीन पौळ, अविनाश बाराते, ऍड. अजित मोटे, निलेश वीर यांसह वृत्त संकलन करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप मोटे, संभाजी भोसले, मधुकर लिमकर, विजय मोटे, ऍड. विठ्ठल खवले, ऍड. उत्तम टाळके, ऍड. मकरंद सोन्ने, गणेश वाघमारे, दादासाहेब मुंडेकर आणि जगताप सर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम शेख यांनी केले.
