डोक्यात बिअरची बाटली मारुन केले होते जखमी, वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वारजे माळवाडी येथील दर्या बारच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घालून तरुणाच्या कपाळावर बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला होता. या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी मोक्का करवाई केली होती. मोक्का कारवाईनंतर गेली तीन महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला वारजे पोलिसांनी बीड येथून जेरबंद केले.
विशाल ऊर्फ जॉकी नारायण वारकड (वय २५, रा. रामनगर, वारजे, मुळ रा़ आमला, ता़ धारुर, जि बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी धनंजय एकनाथ गुरव (वय २६, रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार दर्या बार समोरील मोकळ्या मैदानात ९ जून २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला होता.
फिर्यादी व त्याचे मित्र बंठी कुचेकर, विशाल पुरे, वैभव टेकाळे हे दर्या बारसमोरील मोकळ्या जागेत वॉश रुमसाठी गेले होते. भिंतीच्या पलीकडे आदित्य मारणे विकी करंजाळे, विशाल वारकडे हे दारु पित बसले होते. त्यांनी यांना तुम्ही इथे आमचे समोर गोंधळ का करताय, तुम्हाला लय मस्ती आली का असे म्हणून शिवीगाळ केली.
आदित्य मारणे याने त्याच्या हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या कपाळावर मारुन गंभीर जखमी केले. विशाल वारकड याने हातातील हत्यारे हवेत फिरवुन आम्ही इथले भाई असून आताच जेलमधून बाहेर आलोय, आम्ही कोणालाही घाबरत नाही, आमचेमध्ये कोणी आले तर कोणालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन दहशत पसरवली होती.
पोलिसांनी इतरांना पकडले. परंतु, विाशाल वारकड हा फरार झाला होता़ त्यामध्ये पोलिसांनी मोक्का कारवाईही केली. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार सागर कुंभार व बालाजी काटे हे पोस्को गुन्ह्यातील आरोपीचा अहिल्यानगर येथे शोध घेत होते. परंतु, तो आरोपी काही मिळून आला नाही.
त्याचवेळी पोलीस अंमलदार सागर कुंभार व बालाजी काटे यांना विशाल वारकड हा बीड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक १० सप्टेंबर रोजी पहाटे बीड मध्ये पोहचून त्यांनी विशााल वारकड याला ताब्यात घेतले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजी काईगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे, निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, सागर कुंभर, योगेश वाघ, शरद पोळ, निखील तांगडे, अमित शेलार, अमित जाधव, महादेव शिंदे, अमोल सुतकर, गणेश शिंदे, सत्यजित लोंढे यांनी केली आहे.
