भारत सासणे : डॉ. संजय चोरडिया यांना अॅड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “सर्वांगीण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने नैतिकता जपणे आवश्यक आहे. कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचले पाहिजे. सामाजिकतेचा आग्रह धरत ज्ञान देण्याची वृत्ती असणाऱ्या प्रकाशवाटेची आज समाजाला गरज आहे”, असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले.
आडकर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘अॅड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार’ सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांना सोमवारी सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन हटकर, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. अविनाश आव्हाड, डॉ. सुषमा चोरडिया, आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते.
सासणे पुढे म्हणाले, “आजच्या सामाजिक नैराश्याच्या वातावरणात आपण सर्वच पातळींवर विभाजित होत आहोत. अशा परिस्थितीत दर्जेदार, आरोग्यपूर्ण व पर्यावरणपूरक शैक्षणिक वातावरण निर्माण झाले पाहिजे.”
सुराणा यांनी परिचय करून दिला. वैजयंती आपटे यांनी मानपत्राचे वाचन केले. निरुपमा महाजन यांनी सूत्रसंचालन केले. ‘अॅड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार’ डॉ. संजय चोरडिया यांना प्रदान करण्यात आला.
या वेळी (डावीकडून) अॅड. अविनाश आव्हाड, अॅड. प्रमोद आडकर, डॉ. चोरडिया, डॉ. सुषमा चोरडिया, भारत सासणे आणि सचिन ईटकर.
“कायद्याचे देव समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या नावे मिळणारा पुरस्कार माझ्यासाठी मोलाचा आहे. अॅड. आव्हाड यांनी समाजासाठी अखंडितपणे कार्य केले.” – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
