महाराष्ट्र जैन वार्ता
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेले छत्रपती संभाजीनगर आता दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. पुढील काही वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
या विकासयात्रेत खिंवसरा ग्रुपने नवीन पाऊल टाकत रिअल इस्टेटबरोबरच आदरातिथ्य, मनोरंजन व फॅशन क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू केला आहे. खिंवसरा ग्रुपने द मचान, आनंदा स्पा अँड रिसॉर्ट्स, क्लार्क्स कलेक्शन आणि क्लार्क्स रिसॉर्ट्स यांसारख्या नामांकित ब्रँड्ससोबत करार केले असून, शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या विस्ताराच्या नव्या टप्यात बॉलिवूड अभिनेते राजकुमार राव यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. पत्रपरिषदेत व्यवस्थापकीय संचालक, जीतोचे FCP मेंबर व JATF सदस्य रवींद्र खिंवसरा, सिद्धी खिंवसरा व सत्यजित खिंवसरा यांनी सांगितले की, शहरातील विविध भागांत ५०० नवीन रूम्सचे बांधकाम सुरू आहे.
यात बिझनेस हॉटेल्स, लक्झरी स्टे, वेलनेस रिसॉर्ट्स आणि डेस्टिनेशन वेडिंग्जसाठी अत्याधुनिक सुविधा असतील. तसेच शहरात तीन ठिकाणी अल्लोरा सिनेमाज मल्टीप्लेक्स उभारले जात असून, राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी रेगस को-वर्किंग ऑफिस स्पेस विकसित केले जात आहे.
हे स्पेस स्टार्टअप्स, उद्योजक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना अत्याधुनिक सुविधा पुरवणार आहे. खिंवसरा ग्रुपने प्री-लीज्ड हॉस्पिटॅलिटी प्रॉपर्टीज ही गुंतवणुकीची अभिनव पद्धत सादर केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना स्थिर व निश्चित परतावा मिळणार असून, स्वतःच्या मालकीच्या प्रॉपर्टीवर वाढत्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचा भाग होण्याची संधी मिळेल.
“या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन रवींद्र खिंवसरा यांनी केले. यावेळी खिंवसरा ग्रुपतर्फे ‘पिक्सीपाय’ या प्रीमियम बेबी क्लोदिंग ब्रँडची घोषणाही करण्यात आली.















