विद्यार्थ्यांचा उत्साह, पालक-शिक्षकांची उपस्थिती, सुवर्णपदकाने सन्मानित झाले टॉपर्स
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC–PGDM) तर्फे बावधन कॅम्पस येथे पीजीडीएम (बॅच 2023–25) पदवीदान समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. शैक्षणिक दिमाख, सांस्कृतिक अभिमान आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद यामुळे हा समारंभ अविस्मरणीय ठरला.
र्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया (संस्थापक व अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन) यांनी Convocation Call to Order दिली. सूत्रसंचालन डॉ. मेधा देशमुख यांनी केले.
या प्रसंगी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सौ. सुषमा चोरडिया (उपाध्यक्ष), स्नेहल नवलखा (असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट), डॉ. प्रतिक्षा वाबळे (डीन अकॅडेमिक्स), डॉ. विवेक स्वामी (फॅकल्टी, SIMMC), शिक्षकवर्ग तसेच पालक मान्यवर उपस्थित होते.
स्वागतपर भाषणात डॉ. प्रतिक्षा वाबळे यांनी समारंभाला दिशा दिली. डॉ. सुनैत्रा गायतोंडे यांनी शपथविधी सोहळा पार पाडला. या सोहळ्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांचा नैतिकता, मूल्ये आणि आयुष्यभर शिक्षण याबद्दलचा संकल्प दृढ झाला.
तसेच त्यांनी नेतृत्वाबद्दल प्रतिपादन केले की, नेतृत्व म्हणजे फक्त उद्दिष्टे गाठणे नव्हे, तर लोकांना प्रेरणा देणे आणि योग्य दिशा दाखवणे होय. सौ. सुषमा चोरडिया यांनीही विद्यार्थ्यांना समाजात सकारात्मक बदल घडवून जबाबदार नागरिक बनण्याचे मार्गदर्शन केले.
याशिवाय शैक्षणिक गुणवंतांना पदके, प्रमाणपत्रे तसेच क्लास रिप्रेझेंटेटिव्ह (CR) गौरवपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या पालक, शिक्षक आणि संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्नेहल नवलखा (असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, SEF) यांनी आभारप्रदर्शन केले. पारंपरिक कॉन्व्होकेशन कॅप उडवून विद्यार्थ्यांनी यशाचा आनंद साजरा केला.
आनंद आणि अभिमानाच्या वातावरणात झालेला SIMMC–PGDM पदवीदान समारंभ 2025 हा केवळ शिक्षणाचा उत्सव नव्हता, तर सूर्यदत्तच्या जबाबदार राष्ट्रनिर्माते घडवण्याच्या ध्येयाला अधोरेखित करणारा क्षण ठरला.
पदवीदान हा शेवट नाही, तर खऱ्या प्रवासाची खरी सुरुवात आहे. यश सहज मिळत नाही; सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि समर्पण हेच त्याची गुरुकिल्ली आहेत प्रत्येकामध्ये भारताला 2047 पर्यंत जागतिक नेतेपदी नेण्याची अपार क्षमता आहे – फक्त ती ओळखून आत्मसात करायची आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
गुणवंतांचा सन्मान – सुवर्णपदक :
खुशी राकेश चोरडिया
रौप्यपदक : कशिश राजीव सिंगल
कांस्यपदक : जान्हवी नरेंद्र नाईक
