अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आधार, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विशेष मदत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन जय शिवराय प्रतिष्ठानतर्फे बार्शी ४१ शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली.
यामध्ये ३८ कुटुंबांना प्रत्येकी ३ हजार रुपये तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख रक्कम बार्शीचे तहसीलदार एफ.आर. शेख, माजी गटनेते विजय राऊत, बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे आदी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. हा उपक्रम मराठा मंदिर, बार्शी येथे पार पडला.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाची मदत मिळण्यास वेळ लागणार असल्याने तातडीचा आधार म्हणून जय शिवराय प्रतिष्ठानने सात गावांमधील शेतकऱ्यांचा सर्वे करून ही मदत केली.
संघटनेतर्फे यावेळी शेतकऱ्यांना आत्महत्या न करता संकटकाळी मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच आगामी काळात शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला इंजिनीअर आकाश नलवडे, बांधकाम विभागाचे अधिकारी संतोष मोळवणे, माजी उपसभापती अविनाश मांजरे, स्मार्ट अकॅडमीचे प्रमुख सचिन वायकुळे, माजी गटनेते दीपक राऊत, अमृत राऊत, पोद्दार स्कूल संचालक संदीप बरडे, माजी नगरसेवक मदन गव्हाणे, नगरसेवक संतोष बारंगुळे, नगरसेवक विजय चव्हाण, दीपक रोंगे, माजी सरपंच पंडित मिरगणे, सरपंच प्रदीप नवले, हनुमंत धस, सौ. शैलजा गीते, धनाजी पवार, निलेश पवार, युवराज ढगे, सूरज चंदनशिवे, हनुमंत जगदाळे, रावसाहेब यादव, हेमंत सावंत, प्रशांत नागरगोजे, महेश देशमुख, अजय पाटील, अजित बाबर, सागर गरड आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्तव्य निधी समिती प्रमुख किरण कोकाटे, ॲड. गणेश हांडे तसेच विशेष निधी गोळा करण्यासाठी सौ. शैलजा गीते आणि सायरा मुल्ला यांनी विशेष प्रयत्न केले.
जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य विजय राऊत, गणेश पन्हाळकर, अमोल वाणी, यश कदम, नागराज सातव, सुरज वाणी, अमित नागोडे, विनीत नागोडे, ॲड. आकाश तावडे, विनायक हांडे, सुहास गुंड, संकेत वाणी, अविनाश वैद्य, मॉन्टी पौळ, शुभम चव्हाण, अमित नागोडे, कृष्णा परबत, अमित चव्हाण, वैभव विधाते, सुस्मित बागल, ओम सुरवसे, कमलेश कोटगुंड आदी सदस्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
