लक्ष्मीपुजनाच्या दिवशी आगीच्या घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी नाही
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : लक्ष्मीपुजनाच्या रात्री शहरात फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान आगीच्या तब्बल ४२ घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बहुतांश ठिकाणी पेटते फटाके घरांवर, झाडांवर, गवतावर किंवा कचर्यावर पडल्यामुळे आग लागल्याचे समोर आले आहे.
फुरसुंगी परिसरातील एका उंच इमारतीच्या दहाव्या मजल्यावर पेटता बाण गॅलरीत पडल्याने पडदा पेटला आणि घरात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. तत्परतेने केलेल्या या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.
अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षानुसार, शहरातील आगीच्या घटना सायंकाळी पाच वाजून बारा मिनिटांपासून रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत नोंदविल्या गेल्या.
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी लागलेल्या आगींची यादी
०५:१२ – हडपसर, गल्ली क्र. १५ येथे मोकळ्या जागेत आग
०७:२० – वारजे, चौधरी दत्त मंदिराजवळ दुकानात आग
०७:४५ – नरहे गाव, झील कॉलेजमागे इमारतीच्या गच्चीवर आग
०७:५८ – काळेपडल, गजानन महाराज मंदिराजवळ गच्चीवर आग
०७:५९ – बुधवार पेठ, दत्त मंदिराजवळ गच्चीवर आग
०८:०४ – कसबा पेठ, कागदीपुरा येथे चौथ्या मजल्यावरील गॅलरीत आग
०८:१० – विमाननगर, संजय पार्क येथे नारळाच्या झाडाला आग
०८:२२ – मांजरी खुर्द येथे रस्त्याच्या कडेला गवताला आग
०८:२५ – भवानी पेठ, क्षेत्रिय कार्यालयाजवळ गॅलरीत जाळीला आग
०८:२७ – नगर रोड, वडगाव शेरी गणेशनगर येथे दुचाकी वाहनाला आग
०८:२९ – धानोरी, कलवड वस्ती येथे कचर्याला आग
०८:३५ – वारजे, तपोधाम कमानीजवळ तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीत आग
०८:३६ – कसबा पेठ, नागझरी भागात कचर्याला आग
०८:३६ – धायरी फाटा येथे तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग
०८:४० – विमाननगर, जीवन सुपर मार्केटजवळ गोडाऊनमध्ये आग
०८:४६ – शुक्रवार पेठ, फडगेट पोलिस चौकीसमोर घराच्या छतावर आग
०८:५१ – घोरपडी पेठ, मोठा गणपती मंडळाजवळ चौथ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग
०८:५४ – गणेश पेठ, डुल्या मारुती चौक येथे गच्चीवर आग
०९:०२ – बाणेर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळ घरामध्ये आग
०९:२५ – बी.टी. कवडे रोड, इमारतीतील पार्किंगमध्ये आग
०९:२६ – वानवडी, कामठे उद्यानाजवळ वर्कशॉपच्या पत्र्यावर प्लास्टिकला आग
०९:२८ – बाणेर, पॅनकार्ड क्लब रोडवरील इमारतीत आग
०९:३८ – मंगळवार पेठ, भीमनगर कमान येथे वाड्यातील घराला आग
०९:४५ – विश्रांतवाडी, गंगाकुंज सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर आग
०९:५५ – येरवडा, चिञा चौक येथे घरात आग
०९:५७ – सोलापूर बाजार, पोटमाळ्यावर आग
१०:०२ – मार्केट यार्ड, गेट क्र.९ जवळ झाडाला आग
१०:०४ – दारुवाला पूल, देवजीबाबा चौक येथे छतावर आग
१०:०६ – वडगाव बुद्रुक, मोकळ्या मैदानात कचऱ्याला आग
१०:०८ – धानोरी, भैरवनगर येथे झाडाला आग
१०:११ – सिंहगड रोड, सावित्रीबाई फुले वसाहत येथे घरात आग
१०:१६ – सदाशिव पेठ, उद्यानप्रसाद कार्यालयात पार्किंगमध्ये आग
१०:१९ – सिंहगड रोड, मधुकर हॉस्पिटलजवळ घरात आग
१०:२४ – बाणेर-सुस रोड, अकराव्या मजल्यावर आग
१०:२६ – सिंहगड रोड, हिंगणे चौक येथे घरात आग
१०:४० – काळेपटल, तुकाई टेकडीजवळ गवताला आग
१०:४९ – बिबवेवाडी, कोणार्क गार्डन सोसायटीत पहिल्या मजल्यावर आग
१०:५२ – काशेवाडी, गल्ली क्र.१० येथे कचऱ्याला आग
११:१० – कोथरूड, म्हाडा कॉलनीजवळ केबलला आग
११:२६ – दांडेकर पूल चौकात दुकानात आग
११:४० – नानापेठ, भाजी मंडईत इलेक्ट्रिक दुचाकीला आग
११:४५ – औंध, बँक ऑफ महाराष्ट्राजवळ चौथ्या मजल्यावर आग















