“प्रभावी प्रतिनिधित्वासाठी युवकांनी पुढे येणे ही काळाची हाक” : उपाध्याय प्रवर प. पू. प्रवीणऋषीजी म. सा.
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाचा राजकीय जागरणाचा नारा देणारा “पुणे सकल जैन समाज मेळावा” ऐतिहासिक उत्साहात पार पडला. वर्धमान सांस्कृतिक भवन, पुणे येथे पार पडलेल्या या मेळाव्याने जैन समाजाच्या संघटित शक्तीचा, एकतेचा आणि राजकीय सजगतेचा भव्य अविष्कार घडवला.
या भव्य मेळाव्यास दीड हजाराहून अधिक जैन बंधू-भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी आणि उत्साही युवक-युवती उपस्थित राहिले. मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वपक्षीय जैन उमेदवारांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती!
मेळावा उपाध्याय प्रवर प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. यांच्या पावन सानिध्यात, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवचनात सांगितले की, “समाजाची ताकद मतदान पेटीतून दिसते.
युवक पुढे आले, तर जैन समाजाचे प्रतिनिधित्व केवळ नगरसेवकपदापुरते मर्यादित राहणार नाही तर ते परिवर्तनाची दिशा देईल.” या मेळाव्यात राजकीय नेते अभय छाजेड, बाळासाहेब ओसवाल, प्रविण चोरबोले, सुनील लोढा, लक्ष्मीकांत खाबिया, मितेश नाहटा, अक्षय जैन, सामाजिक नेते विजय भंडारी, इंदर छाजेड, राजेंद्र बांठिया आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि इच्छुक उमेदवारांना दिशा दिली.
पुण्यात १ लाखाहून अधिक जैन समाज असून, येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणता पक्ष जैन समाजाला किती जागा देतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्याने निश्चितच पुण्यातील राजकारणात जैन समाजाच्या नव्या युगाचा प्रारंभ केल्याची भावना प्रत्येक उपस्थितांच्या चेहऱ्यावर झळकत होती.
मेळाव्याचे सूत्रसंचालन संदीप भंडारी यांनी उत्स्फूर्तपणे केले, तर आभार प्रदर्शन महेंद्र सुंदेचा मुथा यांनी व्यक्त केले. आयोजनासाठी प्रकाश बोरा, मयूर सरनोत, जिनेंद्र कावेडिया, विनोद सोळंकी, अभिजीत शहा, निमेश शहा, सागर लुनिया, ऋषिकेश शहा, संतोष बोरा, आनंद गादिया, पंकज बाफना यांनी परिश्रम घेतले.
सर्वपक्षीय जैन उमेदवारांची नावे –
भाजप : प्रवीण चोरबोले, बाळासाहेब ओसवाल, महेंद्र सुंदेचा मुथा, आनंद छाजेड, भरत भुरट, विपेश सोनीग्रा, प्रतीक देसरडा, राजकुमार बाफना, कुंतीलाल चोरडिया, श्रीमल बेदमुथा, प्रकाश बाफना, प्रीती पाटील, अजित चंगेडिया, शितल सोनीग्रा.
काँग्रेस : भरत सुराणा, आनंद बाफना, योगिता सुराणा, अरुण कटारिया.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : निलेश शहा, प्रशांत गांधी.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : जया बोरा, सुवर्ण कोठारी.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : रिषभ नानावटी.
मनसे : ऋषभ सिंगवी.
अपक्ष : निखिल मुनोत, हर्षदा मुनोत.















