अध्यक्षपदी पंकज फुलपगर, महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी संतोष ललवाणी तर पुणे जिल्हा प्रमुखपदी सुरेश गांधी यांची नियुक्ती
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : प. पू. उपाध्याय प्रवीणऋषीजी म.सा. यांच्या मंगल सान्निध्यात गौतम निधीच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा वर्धमान संस्कृतिक केंद्र येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
या प्रसंगी गौतम निधीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पंकज फुलपगर, महामंत्रीपदी नितीन संकलेचा, महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी संतोष ललवाणी, राज्य महामंत्रीपदी पवन भंडारी, पुणे जिल्हा प्रमुखपदी सुरेश गांधी, तसेच जिल्हा महामंत्रीपदी जितेंद्र मुनोत यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमास राष्ट्रीय निमंत्रक सुनिल नहार, चातुर्मास कमिटी की स्वागत अध्यक्ष राजश्री पारख, राष्ट्रीय संयोजक अनिल नहार, बाबुलाल बोरा, तसेच पुणे शहर जितो प्रमुख इंद्रकुमार छाजेड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजेंद्र दर्डा होते.
यावेळी प. पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांनी आपल्या आशीर्वचनांत सांगितले की, “गौतम निधीची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन अध्यक्ष पंकज फुलपगर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य अधिक व्यापक, सशक्त आणि समाजोपयोगी होईल.” त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना धर्म, सेवा आणि एकतेच्या मार्गावर निष्ठेने कार्य करण्याचे मार्गदर्शन दिले.
आपल्या मनोगतात राजेंद्र बाबू दर्डा यांनी गौतम निधीच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “गौतम निधीच्या माध्यमातून सेवा, शिक्षण आणि विकास या तिन्ही क्षेत्रांमध्ये जैन समाजात प्रचंड प्रमाणात कार्य होत आहे. समाज uplift करण्याची ताकद या संस्थेमध्ये आहे.”
पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पंकज फुलपगर यांच्या कार्याचा उल्लेख करत म्हटले की, “अतिशय योग्य व्यक्तीच्या हातात गौतम निधीची सूत्रे दिली गेली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था आणखी प्रभावीपणे पुढे जाईल, याची खात्री आहे.”
दर्डा यांनी सर्व समाजबांधवांना आवाहन केले की, “गौतम निधीच्या या सेवा प्रवासात तन, मन आणि धनाने सहभागी होऊन समाजहितासाठी उभे राहा.” या शपथविधी सोहळ्याने जैन समाजात एकता, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.















