महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : रिपब्लिकन सेनेच्या भूम तालुका अध्यक्षपदी मुकुंद लगाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार, जिल्हा प्रभारी कपिल सरोदे आणि जिल्हाध्यक्ष अनिल हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
या बैठकीस महिला आघाडी महाराष्ट्र सदस्या रेश्मा शेख, जिल्हाध्यक्ष मनिकरणा साखरे, धाराशिव तालुका अध्यक्ष गौतम बनसोडे, तसेच पपण गायकवाड उपस्थित होते. बैठकीदरम्यान मुकुंद लगाडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी नव्याने निवड झालेल्या तालुका अध्यक्ष मुकुंद लगाडे यांनी सांगितले की, “तालुक्यातील गावागावात आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या शाखा स्थापन करून संघटनेचा झेंडा बुलंद करण्याचे काम वेगाने हाती घेतले जाईल.”
तसेच, या कार्यक्रमात सुभाष जावळे यांची तालुका महासचिवपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमास शहर नेते पंचशील गायकवाड, अमोल इनामदार, संकेत पैठणपगारे, दत्तात्रय शिंदे, सादिक सय्यद, महावीर बनसोडे, शिवाजी पायाळ, किरण गायकवाड, अमजद मोगल, सुदाम घोडे, भैरव आठवले आणि राजा जाधव उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी मुकुंद लगाडे आणि सुभाष जावळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.















