महाराष्ट्र जैन वार्ता
आळंदी : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदी सुरेश वडगांवकर यांची फेरनिवड झाल्याचं संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी सांगितले.
सुरेश वडगांवकर हे गेली 48 वर्ष संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे ते आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते व श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे गेली 26 वर्ष अध्यक्ष आहेत. संस्थेचे इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष पांडुरंग चंद्रकांत कुऱ्हाडे, सचिव अजित सुरेश वडगांवकर, खजिनदार डॉ. ज्ञानेश्वर श्रीधर पाटील हया निवडी झालेल्या विश्वस्त सभेमध्ये करण्यात आल्या.
संस्थेचे सचिव अजित वडगांवकर या संदर्भात माहिती देत असताना म्हणाले की, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत सुरेश वडगांवकर, अजित वडगांवकर, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, पांडुरंग कुऱ्हाडे यांची विश्वस्त म्हणून फेरनिवड करण्यात आली व योगेंद्र कुऱ्हाडे यांची प्रथमच विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आणि झालेल्या विश्वस्तांच्या सभेमध्ये वरील प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले.
आम्ही आजपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन संस्था प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच आमची ही फेरनिवड सभासदांनी बिनविरोध केली व यापुढेही सर्वांच्या सहभागातून संस्थेचा उत्तरोत्तर विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल. याकरीता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
















