राज्यमंत्री माधुरी मिसाळ : “योगेश टिळेकर यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळेच प्रभाग क्रमांक ४० मध्ये वेगवान विकास”
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : प्रभाग क्रमांक ४० मधील काकडे वस्ती ते ह.भ.प. पुंडलिक दादा टिळेकर चौक या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. २३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे कोंढवा परिसराचा चेहरामोहराच बदलणार आहे.
कार्यक्रमात बोलताना आमदार योगेश टिळेकर यांनी प्रभागातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली. “देशात–राज्यात भाजपचे सरकार आणि महानगरपालिकेतही भाजपची सत्ता असल्यासच विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकते,” असे सांगत येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
टिळेकर यांनी पुढील काळात आणखी अनेक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. आपल्या मनोगतामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, “योगेश टिळेकर यांच्यासारख्या कार्यक्षम व्यक्तीला विधान परिषद सदस्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळेच राज्य शासनाचा मोठा निधी या भागाला मिळाला आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की कात्रज–कोंढवा रोड लवकरच पूर्ण होत असून बाधितांना रोख मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने हा रस्ता नागरिकांसाठी लवकरच खुला होईल. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम, राणी भोसले, वीरसेन जगताप, वृषाली कामठे, राजाभाऊ कदम, सुनील कामठे, रायबा भोसले, चेतन टिळेकर, करण मिसाळ, अभिजीत शहा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश – या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोंढवा परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेश व स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग ४० मध्ये भाजपची ताकद अधिक वाढल्याचे यावेळी नेतृत्वाने स्पष्ट केले.

















