देशातील टॉप ‘A’ कॅटेगरी बी-स्कूल्समध्ये सूर्यदत्तचा समावेश: सलग २५ वर्षे मानांकनाचा बहुमान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटने प्रतिष्ठित GHRDC रँकिंग 2025 मध्ये देशातील टॉप पंधरा ‘A’ कॅटेगरी बी-स्कूल्समध्ये स्थान पटकावत पुन्हा एकदा अभिमानाची कामगिरी साधली आहे. सलग पंचवीस वर्षे मिळालेला हा मानांकनाचा बहुमान सूर्यदत्तच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि नवोन्मेषी दृष्टीकोनाची साक्ष देतो.
सूर्यदत्त व्यवस्थापन संस्थेला ग्लोबल ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर (GHRDC) कडून देशातील प्रतिष्ठित व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये उच्च श्रेणीचे मानांकन मिळाले आहे. सलग २५ वर्षे मिळणारे हे मानांकन सूर्यदत्तच्या नेतृत्वपरंपरेची आणि शैक्षणिक उत्कृष्टतेवरील सातत्यपूर्ण निष्ठेची प्रचिती देते.
GHRDC बी-स्कूल्स सर्व्हे 2025 मध्ये सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (SIBMT) यांनी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत देशातील टॉप १५ आणि महाराष्ट्रातील खासगी बी-स्कूल्समध्ये टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे.
या सर्व्हेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, नवोन्मेषी अध्यापन पद्धती, शिक्षकांची गुणवत्ता, संशोधन, पायाभूत सुविधा, उद्योगसंवाद आणि प्लेसमेंट परिणामकारकता या घटकांचा काटेकोरपणे आढावा घेण्यात आला. सर्व निकषांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत सूर्यदत्त संस्थेने उल्लेखनीय स्थान पटकावले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सूर्यदत्त संस्थेने वर्गखोल्यातील शिक्षणासोबत उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव, संशोधन आणि मूल्याधारित शिक्षण यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनवले आहे.
हा बहुमान मेकला सिन्हा, कार्यकारी संचालिका, ग्लोबल ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या हस्ते सूर्यदत्त संस्थेला प्रदान करण्यात आला. त्यांनी सूर्यदत्तच्या जागतिक दर्जाच्या अध्यापन पद्धती, नवोन्मेष आणि व्यवस्थापन शिक्षणातील योगदानाचे कौतुक केले.
हा बहुमान सूर्यदत्तच्या दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या उल्लेखनीय प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, ‘उत्कृष्ट शिक्षणाद्वारे करिअर घडवणे आणि जीवन समृद्ध करणे’ या संस्थेच्या ध्येयाची पुनर्प्रतिष्ठा करणारा आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















