75 वर्षीय नागरिकाला बेवारस दुचाकी सुपूर्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात मुद्देमाल निर्गतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याच अनुषंगाने कसबा पेठ, बार्शी येथील रहिवासी जगन्नाथ बापूराव सरवदे (वय 75 वर्षे) यांची मोटरसायकल क्रमांक MH 13 BE 0886 ही दुचाकी बेवारस अवस्थेत आढळून आली.
पोलीसांनी संपर्क साधला असता, उच्च वयामुळे ते स्वतः पोलीस ठाण्यात येऊ शकत नसल्याचे त्यांनी कळवले. नागरिकाभिमुख भूमिकेतून पुढाकार घेत बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदारांच्या मार्फत त्यांची दुचाकी घरपोच पोहोच करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांना पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता भासली नाही, ही अत्यंत स्तुत्य बाब असून श्री. जगन्नाथ सरवदे यांनी बार्शी पोलिसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, तसेच पोलीस अंमलदार सचिन कदम, प्रवीण शहाणे व शरद साळवे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. बार्शी पोलीसांचा संवेदनशील व नागरिकाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित करणारी ही प्रशंसनीय कामगिरी.















