भाजपा जिल्हाध्यक्ष केदार-सावंत यांच्या पत्रकार परिषदेत घोषणेने युवकांमध्ये उत्साह
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा करत भाजप युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षपदी रणवीर राऊत यांची निवड जाहीर केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयानंतर माजी चेअरमन रणवीर राऊत यांच्या संघटनक्षमतेवर आणि सक्रिय कार्यशैलीवर विश्वास ठेवत पक्ष नेतृत्वाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
या प्रसंगी बार्शी शहराध्यक्ष महावीर कदम तसेच ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे दशरथ टेकाळे उपस्थित होते.नवीन नियुक्तीमुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून युवा मोर्चा अधिक बळकट होईल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना रणवीर राऊत म्हणाले
“सोलापूर जिल्ह्यातील युवकांना संघटनेशी मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी आणि युवा मोर्चाचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वतोपरी मेहनत करीन,” असे त्यांनी सांगत पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.















