मार्केटयार्ड मधील व्यापाऱ्यांकडून शाल-हार अर्पण, व्यापारवाढीवर सखोल चर्चा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड येथील हमाल पंचायतच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोरख मेंगडे यांचा मार्केटयार्ड मधील व्यापाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मार्केटयार्ड येथील हमाल पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे यांचा व्यापारी अभय बन्सीलाल संचेती यांच्या वतीने शाल व हार देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यास अभय संचेती, मनीष संचेती यांच्यासह हमाल पंचायतचे सर्व पदाधिकारी आणि व्यापारी बांधव नितीन नहार, विजय शिंगवी, किरण छाजेड, सुरेंद्र श्रीश्रीमाळ, सचिन गदिया, सुभाष पगारिया, सुरेश वानगोता, हरचंद देसरडा उपस्थित होते.
यावेळी हमाल पंचायतचे खजिनदार चंद्रकांत मानकर यांच्यासह अंकुश अवताडे, शिवाजी बाबर, दत्ताभाऊ डोंबाळे, संदीप मारणे, संदीप धायगुडे, विष्णू गरजे, विठ्ठल भिसे तसेच मोठ्या संख्येने हमाल बांधवांची उपस्थिती होती. या प्रसंगी मार्केट यार्डमधील सध्याच्या कमी झालेल्या व्यापारावर चर्चा करण्यात आली.
व्यापार पुन्हा वाढवण्यासाठी हमाल पंचायत, पुणे मर्चंट चेंबर व मार्केट कमिटी यांच्या संयुक्त माध्यमातून कारणांचा शोध घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत सखोल विचारमंथन झाले.
यावेळी बोलताना अभय संचेती यांनी सांगितले की, व्यापारवाढ हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
व्यापारी आणि शेतकरी हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, हा कणा मजबूत ठेवण्यासाठी व्यापार योग्य व सुसूत्र पद्धतीने चालणे आवश्यक आहे. व्यापारातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी हमाल पंचायतने सक्रिय भूमिका घ्यावी, असेही त्यांनी मत व्यक्त केले.
अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कार्यकाळातील अनुभव आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भविष्यात मार्केट यार्डमधील व्यापार वाढीसाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.















