महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भुम : भुम शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांच्या हस्ते गाढवे यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यकाळासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.), वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शहरातील ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, तरुण बांधव, पत्रकार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















