महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० व २१ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मार्केटयार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, मनीषा चोरबेले, प्रसन्न वैरागे, सिद्धी शिळीमकर तसेच प्रभाग क्रमांक २० मधून भाजपचे अधिकृत उमेदवार महेंद्र मुथा, राजेंद्र शिंळीमकर, मानसी देशपांडे आणि तनवी दिवेकर यांच्या प्रचारासाठी हा मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ललित गांधी, बाबशेठ मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यापारी वर्गाच्या अडचणी, प्रश्न व अपेक्षांबाबत सकारात्मक भूमिका मांडत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
पुणे मार्केटयार्ड व परिसरातील मोठ्या संख्येने व्यापारी या मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या असून त्या सोडवण्यासाठी भाजपचे उमेदवार कटिबद्ध राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रितपणे भाजपच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दर्शवत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.या व्यापारी मेळाव्याचे आयोजन संदीप भंडारी व प्रकाश बोरा यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजकांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


















