रक्तदान शिबिरात १०८ बाटल्यांचे संकलन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्री सच्चियाय माताजी नवदुर्गा मंदिर, पुणे अंतर्गत कार्यरत सौ. प्रमिलाबाई नौपतलालजी साकला चॅरिटेबल ट्रस्टच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १०८ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.
या ट्रस्टचे संस्थापक स्व. नौपतलालजी साकला असून, त्यांच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेतून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. यंदाच्या रक्तदान शिबिरास समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमासाठी सहयोग म्हणून लतिका रवींद्र साकला, मनाली अभिनंदन साकला, सिद्धी, जीत तसेच विराया, सनायरा, ध्रुव व शायरा रविराज रियालिटीज् ग्रुप, रंजना राजेशकुमार साकला, नेहा ऋषभ साकला, तनिश, रिद्धित, तसेच साकला परिवार, रुणाल, अनिमेष, रिद्धी आलेख आणि हेमलता रविंद्र गादिया यांनी मोलाचे योगदान दिले.
मानवी सेवाच खरी ईश्वरसेवा या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे समाजात सामाजिक जाणीव आणि सेवाभाव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
















