महाराष्ट्र जैन वार्ता
मुंबई : Voice of Healthcare यांच्या वतीने देण्यात येणारा “मोस्ट इमर्जिंग चेन ऑफ डायग्नॉस्टिक्स” हा प्रतिष्ठित पुरस्कार डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्सला प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने डायग्नोपिनचे संचालक मितेश कोठारी यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रातील डायग्नॉस्टिक क्षेत्रात डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्सने मिळवलेले नेतृत्व, संस्थेची उच्च नैतिक मूल्यांवर आधारित कार्यसंस्कृती तसेच पारदर्शक आणि विश्वासार्ह कार्यपद्धती यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
अल्पावधीत दर्जेदार सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनामुळे डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्सने आरोग्यसेवा क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

















