सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमचा उपक्रम : महाराष्ट्रभरातील २७ महाविद्यालयांचा सहभाग
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्रातील जागतिक आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन हॉस्पिटॅलिटी स्पर्धा–२०२६ सूर्यदत्त कॉलेज कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्रातील जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक वातावरण लक्षात घेता आणि भारतीय आदरातिथ्य संस्कृतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी, पुण्यातील प्रतिष्ठित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) यांच्या वतीने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन हॉस्पिटॅलिटी स्पर्धा–२०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम सूर्यदत्त समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या दूरदृष्टीतून साकार झाला. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष उद्योगजगतातील अनुभव देणे, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पुण्यासह राज्यातील विविध शहरांमधून एकूण २७ नामवंत हॉस्पिटॅलिटी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. एकूण ५४ गुणवंत स्पर्धकांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी सादरीकरण केले. विविध संस्कृती आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे स्पर्धेला मोठी रंगत आली.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सूर्यदत्त महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांसह २० तज्ज्ञ प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले.
स्पर्धेत दोन प्रमुख उपक्रम पार पडले. “द ग्रँड पोर” या कॉकटेल मेकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नाविन्य, अचूकता आणि सादरीकरण कौशल्यातून परीक्षकांची मने जिंकली. तसेच “युनिफॉर्म्स – रिइमॅजिन्ड” या स्पर्धेत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील पारंपरिक गणवेशाला आधुनिक व शाश्वत स्वरूप देत विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा प्रत्यय दिला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सूर्यदत्तची माजी विद्यार्थिनी व सुप्रसिद्ध बारटेंडर सावंगी उभे हिचा नेत्रदीपक जॉग्लिंग शो. माजी विद्यार्थिनीच्या यशाबद्दल प्रा. डॉ. चोरडिया यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
या स्पर्धेसाठी हयात रीजन्सी, लेमन ट्री आणि बार जॉकी यांसारख्या नामांकित ब्रँड्समधील तज्ज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. बार जॉकी यांच्या प्रायोजकत्वामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या साहित्याचा अनुभव मिळाला.
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन हॉस्पिटॅलिटी स्पर्धा–२०२६ ही केवळ स्पर्धा न राहता, भावी हॉस्पिटॅलिटी व्यावसायिकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली सूर्यदत्त कॉलेजने घेतलेला हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत असून, सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ पदवी पुरेशी नाही. विद्यार्थ्यांकडे सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि उद्योगाभिमुख कौशल्ये असणे आवश्यक आहे. अशा राज्यस्तरीय स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या मानकांची ओळख होते आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडतो. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
















