सीए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याबद्दल ईट येथे गुणगौरव सोहळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : ग्रामीण पत्रकार संघ, ईट यांच्या वतीने येथील विद्यार्थी आदित्य कानडे यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही प्रतिष्ठित परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा भव्य गुणगौरव सत्कार सोहळा मंगळवारी (दि. १०) सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, प्रताप देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गीते, सरपंच संजय आसलकर, राजाभाऊ हुंबे, ग्रामपंचायत सदस्य सयाजी हुंबे, राजसिंह पांडे, भाऊसाहेब चोरमले, नवनाथ हुंबे, डॉ. सुषमा ठोंबरे, शिवाजी भराटे, आबासाहेब वरळे, सविता ठाकणे, नानासाहेब कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदित्य कानडे यांचा विठ्ठलाची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, उपाध्यक्ष दत्ता अहिरे, सचिव समाधान डोके, संघटक भगवान चव्हाण, सचिन स्वामी, सदस्य फैसल काझी, सोमेश्वर स्वामी, संदीपान कोकाटे, महावीर जालन, लक्ष्मण चव्हाण, राजेसाहेब थोरात आदींनी परिश्रम घेतले.
















